Central Railway News: ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांवर मोठी कारवाई; नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

Central Railway News: मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणारे उदंड झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून दादर, कुर्ला स्थानकानंतर पुन्हा एकदा ठाणे स्थानकात धडक तपासणी मोहीम राबवली.
Central Railway News
Central Railway NewsSaam Digital
Published On

Central Railway News

मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणारे उदंड झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून दादर, कुर्ला स्थानकानंतर पुन्हा एकदा ठाणे स्थानकात धडक तपासणी मोहीम राबवली. ठाणे रेल्वे स्थानकावर ६९ तिकीट तपासणी कर्मचारी आणि १७ आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पथकाने १७३१ प्रवाशांवर कारवाई केली आहे. ज्याद्वारे तब्बल ६ लाख २ हजार ६५५ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे लोकल गाड्यांसह रेल्वे स्थानकात मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेकजण विना तिकीट प्रवास करत असल्याने रेल्वेचा महसूल बुडतो. त्यापार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची कठोर तपासणी सुरू आहे. याचाच भाग म्हणून विविध गर्दीच्या स्थानकांवर विशेष तिकीट तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारी २ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे रेल्वे स्थानकावर ६९ तिकीट तपासणी कर्मचारी आणि दोन अधिकारी, १७ आरपीएफ कर्मचारी टीमने तिकीट तपासणी मोहीम राबवली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Central Railway News
Fake Certificate Case: बोगस सर्टिफिकेटच्या आधारे हडपली पोलिसाची नोकरी; २३ वर्षानंतर असा अडकला 'नटरवलाल' जाळ्यात

या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान पथकाने ठाणे स्थानकांचा प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, स्थानक प्रवेशद्वार याठिकाणी तिकीट तपासणीस पथकांनी सखोल तिकीट तपासणी राबवली. या मोहिमेदरम्यान १७३१ फुटक्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ६ लाख २ हजार ६५५ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष ट्रेनमध्ये तिकीट तपासणीचे आयोजन करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

Central Railway News
Mumbai Crime News: विकृतपणाचा कळस! तरुणीकडे पाहून अश्लील इशारे, संरक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकाचं पोलीस आयुक्तांनी केलं कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com