Mumbai Crime News: विकृतपणाचा कळस! तरुणीकडे पाहून अश्लील इशारे, संरक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकाचं पोलीस आयुक्तांनी केलं कौतुक

Mumbai Crime News: विक्रोळीत रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणीवर एका विकृताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एका सुरक्षारक्षकाने हिसका दाखवत तरुणीला त्या नराधमाच्या तावडीतून वाचवले आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Digital
Published On

Mumbai Crime News

विक्रोळीत रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणीवर एका विकृताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एका सुरक्षारक्षकाने हिसका दाखवत तरुणीला त्या नराधमाच्या तावडीतून वाचवले आहे. या घटनेची दखल सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर उतळे यांनी घेतली असून महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षक समीर कोळवणकर यांचे प्रशंसापत्र देऊन कौतुक केले आहे.

सुरक्षारक्षक समीर कोळवणकर शुक्रवारी संध्याकाळी आपली ड्यूटी संपवून बसने निघाले होते. कन्नमवारनगर विक्रोळी स्टेशनवरून जाणारी बस कन्नमवारनगरच्या दिशेने जात असताना टागोरनगरला जाणाऱ्या रस्त्यावरील बस स्टॉपजवळ एक विकृत रस्त्यावरून चालणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीला पाहून लैंगिक चाळे करून हावभाव करत होता. पुरुषाच्या या वर्तनामुळे ती मुलगी घाबरून पळू लागली. तेव्हा आरोपी नराधम तिला पकडण्यासाठी तिच्या दिशेने धावला, मात्र त्याचवेळी तेथून जाणारे सुरक्षारक्षक समीर कोळवणकर यांनी प्रसंगावधान दाखवत त्या मुलीचे संरक्षण केले. त्यामुळे पुढील गंभीर घटना कोळवणकर यांच्यामुळे टळली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Ulhasnagar Gaikwad Firing Case: भाजप आमदार गणपत गायकवाड यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी

ही घटना त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती. तसेच विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये आणि डीसीपी ऑफिसला जाऊन लेखी सूचना केली होती. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणाची दखल सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर उतळे यांनी घेत सुरक्षारक्षक कोळवणकर यांचे प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले.

Mumbai Crime News
Pune University Latest News: ललित कला केंद्र प्रमुख यांच्यासह ६ जणांना अटक; भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com