Railway Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत ९००० जागांसाठी पदभरती, कसा कराल अर्ज?

RRB Technician Recruitment : सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तरुणांसाठी भरतीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे.
Railway Recruitment 2024
Railway Recruitment 2024Saam Tv

Railway Recruitment 2024 Online Application Process:

सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तरुणांसाठी भरतीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला ऑनलाइन (Online) अर्ज करता येणार आहे. याची अंतिम तारीख अजून देण्यात आली नाही. अर्ज (Application) कसा कराल जाणून घेऊया.

रेल्वेच्या टेक्निशियन पदासाठी एकूण ९००० जागा रिक्त आहेत. अधिसूचनेनुसार फेब्रुवारीमध्ये भरती जारी केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून सुरु होईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट (Website) indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल.

1. कोणते उमेदवार पात्र

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराचे किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३३ वर्षांपेक्षा जास्त नसायला हवे.

Railway Recruitment 2024
Jio युजर्ससाठी ऑफर्सचा पाऊस! 50 पैशांमध्ये मिळणार 1GB डेटा, आजच करा रिचार्ज

2. निवड प्रक्रिया कशी असेल?

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला कम्प्युटर बेस आधारित चाचणी द्यावी लागेल. उमेदवाराला CBT1 मध्ये उत्तीर्ण झालेल्या CBT2 परीक्षेत सहभागी होता येईल. CBT2 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. सर्व टप्प्यांत यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना गुणवत्ता यादीत स्थान मिळेल.

3. शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण १० वी उत्तीर्ण असायला हवे. तसेच उमेदवराने ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Railway Recruitment 2024
Maharashtra Health Department: आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; आतापर्यंत २ लाख ५६ हजार लोकांनी केले अर्ज

4. अर्ज शुल्क

  • या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

  • अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

  • अर्ज करणाऱ्या SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त २५० रुपये शुल्क भरावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com