Prashant Kamble who was absconding for 15 years arrested Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : १५ वर्षांपासून फरार, एका लघुपटात दिसला, प्रशासन खडबडून जागी; पुण्यातील प्रशांत कांबळेला अटक

Pune Prashant Kamble : तीन मिनिटांच्या या लघुपटात त्याचं नाव 'सुनील जगताप सर' असं नमूद असून, तो खालापूर (रायगड जिल्हा) येथील आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक काम करीत असल्याचं दाखविण्यात आलं आहे.

Prashant Patil

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : तब्बल १५ वर्षांपासून फरार असलेला आणि पुण्यातून नुकतीच अटक करण्यात आलेला संशयित नक्षलवादी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप (वय ४४) हा १० मार्च २०१८ रोजी युट्यूबवर पोस्ट झालेल्या 'उलगुलान -एव्हरीडे हिरो' नावाच्या एका लघुपटात दिसला. मात्र, तीन मिनिटांच्या या लघुपटात त्याचं नाव 'सुनील जगताप सर' असं नमूद असून, तो खालापूर (रायगड जिल्हा) येथील आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक काम करीत असल्याचं दाखविण्यात आलं आहे.

लघुपटात तो स्वतःच्या कामाची माहिती सांगताना दिसत आहे आहे. हा लघुपट सात वर्ष इंटरनेटवर असूनही तपास यंत्रणांना त्याबद्दल समजलं नाही. त्याने सुनील जगताप नावाने खालापूरच्या पत्त्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि पासपोर्ट देखील मिळवल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. तो २०२१ मध्ये शेतकरी आंदोलनातही सहभागी झाला होता आणि नेपाळसह भारतातील विविध राज्यात फिरायचा, असं पोलिसांनी मुंबई सेशन कोर्टात सांगितलं आहे.

२०११ मध्ये दाखल नक्षलवादाच्या गुन्ह्यात त्याला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने ४ मे २०२५ रोजी अटक केली. कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत १९ मेपर्यंत वाढ केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT