Pune Hit And Run Case  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; अखेर अल्पवयीन तरुणाने सादर केला ३०० शब्दांचा निबंध, पाहा व्हिडिओ

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. यानंतर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे. या अल्पवयीन तरुणाने निबंध लिहून बाल न्याय मंडळापुढे सादर केला आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं होतं. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणामुळे गेल्या काही आठवड्यांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आजोबा, वडील आणि आईला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाने दोघांना उडवल्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. पुढे या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळापुढे सादर केलं होतं. त्यानंतर बाल न्याय मंडळाने अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर या अल्पवयीन मुलाने ३०० शब्दांचा निबंध बाल न्याय मंडळाने सादर केला आहे.

या प्रकरणातील शिक्षेच्या तरतुदीनुसार समुदेशन आणि वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत काम करणे यासारख्या इतर अटींचे पालन करण्यासाठी देखील प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीची काही दिवसांपूर्वी सुटका करण्यात आली. हायकोर्टाच्या निर्णयानंतर अल्पवयीन आरोपी मुलाला बाल सुधारगृहातून सुटका करण्यात आली होती. मात्र, आरोपीची सुटका झाल्यानंतर पुणे पोलिसांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने पुणे पोलिसांची मागणी मान्य केल्यास या अल्पवयीन आरोपी मुलाची पुन्हा बाल सुधारगृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! आजच बँक खातं तपासा; लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पुन्हा ३००० रुपये जमा

Vande Bharat Train : वंदे भारत, राजधानी, शताब्दीपेक्षा 'या'ट्रेनचं भाडे दीडपट जास्त

Assembly Election: विधानसभा निवडणुकांनंतर NDAला हादरा! नितीश कुमार देणार 'जोर का झटका', नेमकं राजकारण काय?

Marathi News Live Updates : शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला

Shani Nakshatra Parivartan: पुढील २ महिने 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

SCROLL FOR NEXT