Pune Sassoon Hospital Dr Ajay Taware Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident Case : मोठी बातमी! अल्पवयीन मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलणारा मास्टरमाइंड कोण? पोलीस चौकशीत नाव उघड

Satish Daud

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवनीन खुलासे होत आहेत. धनिकपुत्राला वाचवण्यासाठी येरवाडा पोलीस आणि ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं समोर आलं आहे. अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. कोर्टाने दोघांनाही ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्या दोन्ही डॉक्टरांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. यादरम्यान अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यामागे कुणाचा हात होता? या घटनेमागील मास्टरमाइंड कोण? हे आता समोर आलं आहे. रक्त नमुना बदल्याचा मास्टरमाइंड डॉ. अजय तावरे हाच होता, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ अजय तावरे यानेच हळनोर याला रक्ताचे नमुन बदलण्यास सांगितले होते. रक्ताचे नमुने बदलल्यानंतर पोलिसांचा तपास भरकटेल आणि पुरावा शिल्लक राहणार नाही, यासाठी दोघांनी हा प्लान आखल्याचं समोर आलं आहे.

अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून त्याजागी भलत्याच व्यक्तीचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. हे काम करण्यासाठी दोन्ही डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्याकडून लाखो रुपये घेतले होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.

विशाल अगरवाल आणि डॉ तावरे यांच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार ठरला होता का? याचा कसून तपास आता पोलीस करीत आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांनी डॉ. अजय तावरेच्या घरी धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या अजय तावरेला घेऊन पुणे पोलीस त्याच्या घरी गेले होते. तेव्हा पोलिसांनी तेथे कसून चौकशी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: प्रेमासाठी काय पण..! बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं अन् कुलूप लावलं, लेकीचा प्रताप पाहून कुटुंबीय चक्रावले VIDEO

Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! उत्तर प्रदेशमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT