नितीन पाटणकर, पुणे
कल्याणी नगर येथील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या कथित रॅप साँग काही दिवसांपूर्वी जोरदार व्हायरल झाला होता. या प्रकरणामध्ये व्हिडिओ पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील शुभम शिंदेला पुणे पोलिसांची नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये शुभम शिंदेला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. त्यावर आता शुभमने स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांनाच प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या नोटिशीला शुभम शिंदे या तरुणाने उपरोधक प्रश्न विचारले आहेत. पुणे पोलिसांनी मला नोटीस देत चौकशीला बोलवलंय, त्यांना मी काय उत्तर देऊ? व्हिडीओच्या सुरुवातीला असं म्हणत शुभम शिंदेने पुणेकरांना आधी प्रश्न विचारला आहे.
निबंध लिहून घेऊन जाऊ का?
चौकशीला जाताना मी देखील निबंध लिहून घेऊन जाऊ का? की माझा बाप बिल्डर आहे असे पोलिसांना सांगू? असा प्रश्न शुभम शिंदेने व्हिडिओमधून पुणे पोलीस आयुक्त पुणे पोलिसांना विचारला आहे.
उद्या माझ्यासोबत काय होईल मला माहिती नाही...
फक्त मी एकट्यानेच व्हिडिओ व्हायरल किंवा फॉरवर्ड केला नाही, तर पुणेकरांनी आणि देशातील अनेक नागरिकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यांनाही पुणे पोलिसांनी नोटीस दिली आहे का? त्यांनाही पुणे पोलीस नोटीस देणार का? जर मी गुन्हेगार असेल तर प्रत्येक पुणेकर गुन्हेगार आहे? हा व्हिडिओ पोस्ट फॉरवर्ड वायरल करणारा देशातील प्रत्येक नागरिक गुन्हेगार आहे का, असंही शुभम शिंदेने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
शुभमने त्याच्या @shubhamshinde.i या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. न्यायव्यवस्थेशी लढतांना पुणे पोलीसकडून भेटलेल गिफ्ट, असं कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिलं आहे. आता चौकशीवेळी खरोखर त्याच्यासोबत काय घडणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.