Sassoon Hospital Peon Arrested By Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, ससून रुग्णालयाच्या शिपायाला अटक

Sassoon Hospital Peon Arrested By Pune Police: पुणे हिट अँड रन प्रकरणात अटक करकण्यात आलेल्या डॉक्टरांना पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या शिपायाला देखील पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या शिपायाला लवकरच कोर्टात हजर केले जाणार आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांच्या अटकेनंतर आता शिपायाला देखील अटक करण्यात आली आहे. आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप करत डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. आता याप्रकरणात या डॉक्टरांना पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या शिपायाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या शिपायाला लवकरच कोर्टात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि विशाल अग्रवाल यांच्यात पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या शिपायाला पुणे पोलिसांनी आज अटक केली. अमित घटकांबळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमित वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून 3 लाख रुपये घेऊन आला होता हे तपासातून उघड झाले आहे. अमित हा ससून रुग्णालयात शवविच्छेदन विभागात शिपाई म्हणून काम करतो. अतुल हा डॉक्टर अजय तावरे यांचा अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.

पुणे हिट अँड रन प्रकरणी आता पोर्शे कारचे प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले आहेत. पोर्शे गाडीचे अधिकृत प्रतिनिधी त्यांच्या पथकासह मुंबईतून पुण्यात आले आहेत. पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात या प्रतिनिधींकडून कारची तपासणी केली जात आहे. गाडीत तांत्रिक विश्लेषण जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी पुण्यात आले आहेत. पुणे आरटीओचे अधिकारीसुद्धा येरवडा पोलिस ठाण्यात आले आहेत. १९ मे रोजी झालेल्या अपघातात याच पोर्शे कारने दिलेल्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप करत पुणे पोलिसांनी आज ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर यांना अटक केली. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातावेळी अल्पवयीन मुलगा हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत होता. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले होते. पण याच ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT