Porsche Car Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Porsche Car Accident : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात मोठा ट्विस्ट; बदललेले रक्त महिलेचं, चौकशी समितीच्या अहवालानं खळबळ

Dr Shrihari Halnor Claim Dr Ajay Taware: पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. रक्त बदल करण्यासाठी डॉ. तावरेनी दबाव टाकल्याची कबुली डॉ. हाळनोरने दिली आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे. पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्त एका महिलेचे असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता ती महिला कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. अल्पवयीन तरुणाच्या रक्ताच्या नमुण्याऐवजी एका महिलेचे रक्त घेण्यात आले होते. ससून रुग्णालयात बदलण्यात आलेले रक्त एका महिलेचे असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही माहिती चौकशी समितीच्या अहवालात समोर आली आहे.

महिलेचे रक्त सील करून त्यावर अल्पवयीन तरुणाचे नाव लिहून पुढे पाठवण्यात आलं होतं, असं उघडकीस आलं आहे. पुण्यातील हिट अॅंड रन प्रकरणातील आरोपींच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाले (Porsche Car Accident) होते. त्याबाबत आतापर्यंतची ही सर्वात मोठी अपडेट आहे. तर हे रक्त बदल करण्यासाठी बाहेरील चार व्यक्तींचा समावेश असल्याची देखील माहिती मिळत आहे. आता हे चार व्यक्ती कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासोबतच हे ब्लड रिपोर्ट आरोपीच्या आईचे तर नाही, असा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी डॉ अजय डॉ श्रीहरी हाळनोरवर दबाव (Pune News) होता, अशी कबुली पोलिसांसमोर डॉ श्रीहरी हाळनोरने दिली आहे. डॉ. तावरे आणि विशाल यांचं बोलणं झालं. त्यानंतर रक्त बदल करण्यासाठी माझ्यावर तावरेंनी दबाव टाकला, असं स्वत: डॉ. हाळनोरने सांगितलं आहे. डॉ. हाळनोरच्या कबुलीमुळे आता डॉ. तावरेच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे.

रक्त बदल केलं होतं. पण ते माझ्या मनाला पटत नव्हतं. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचं मला वाटत होते, अशी कबुली डॉ. हाळनोरने दिली आहे. डॉ. श्रीहरी हाळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत (Sasoon Hospital) आहे. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड सॅम्पलची (Blood Report) अदलाबदल केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाचे डॉ. तावरे, श्रीहरी हाळनोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT