Vishal Agarwal Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident Case) मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात (Hinjawadi Police Station) विशाल अग्रवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा विशाल अग्रवालविरोधातील सहावा गुन्हा आहे. विशाल अग्रवाल सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोर्शे कार अपघातातील आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालविरोधात आज आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००७ साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रम्हा सोसायटीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अग्रवालविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोसायटीधारकांना पार्किंग, मोकळी जागा देणे बंधनकारक असताना एकाच ठिकाणी अँमिनीटी स्पेस आणि मोकळी जागा दर्शवून सोसायटीधारकांची परवानगी नसताना बिल्डरने ११ मजली आणि १० मजली इमारत बांधली होती. याप्रकरणी विशाल अग्रवाल, राम अग्रवाल, विनोद अग्रवाल, नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात कोंढवा परिसरातील जमिनीच्या व्यवहार प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमिनीच्या व्यवहारात १ कोटी ३२ लाख रुपयांची फवसणूक करण्यात आली होती. या दोघांनीही जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती. याप्रकरणी दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT