Pune Porsche Car Accident Case Saamtv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, मुंबईतून अटक केलेल्या दोघांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी

Sassoon Blood Report Tampering Case: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणात मुंबईतून दोघांना अटक करण्यात आली होती. या आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या दोघांनाही न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस (Pune Police) कोठडी सुनावली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून मंगळवारी या दोघांना अटक केली होती.

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहेत. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर, शिपायी आणि आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक केली होती. या सर्वांच्या चौकशीमध्ये आणखी दोघांची नावं समोर आली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना मुंबईतून अटक केली.

मुंबईतून अटक करण्यात आलेल्या या दोघांचा रक्ताचे नमुने बदलण्यात हात होता. अटकेनंतर या आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना या दोघांनी ३ लाख रुपये दिले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवालवर रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कट रचल्याचा पोलिसांना संशय होता. याप्रकरणी पोलिसांनी शिवानी अग्रवालला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान शिवानी अग्रवालने मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी माझ्या रक्ताचे नमुने दिले असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केली. शिवानी अग्रवाल सध्या पोलिस कोठडीत आहे. याप्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील, आजोबा, आई, ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर, शिपायी अटकेत आहेत. आता आणखी दोघांना अटक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT