Pune Porsche Car Accident Update Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, आरोपी मुलाचा २५ जूनपर्यंत बाल सुधारगृहातच मुक्काम

Pune Kalyani Nagar Accident Accused Will Remain in Juvenile Detention Center: पुणे कार अपघातातील आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला आहे. आज आरोपी मुलाला बाल न्याय मंडळामध्ये हजर करण्यात आले होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही २५ जूनला होणार आहे.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) आरोपी मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला आहे. आज आरोपी मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाला २५ जूनपर्यंत बाल सुधारगृहातच ठेवण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा मुक्काम २५ जूनपर्यंत बाल सुधारगृहातच असणार आहे. बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश आज सुनावणीदरम्यान उपस्थित नव्हते. त्यांच्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान पुणे पोलिसांनी आरोपीला १४ दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली होती. पोलिसांची मागणी बाल न्याय मंडळाने मान्य केली. त्यामुळे आता अल्पवयीन आरोपी मुलाला २५ जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहावे लागणार आहे.

बाल न्याय मंडळात झालेल्या सुनावणीदरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला आणखी १४ दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली होती. ⁠तर बचाव पक्षाने मुलाला घरी सोडण्याची विनंती बाल न्याय मंडळाकडे केली. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी अशी मागणी केली की, तपास सुरु आहे. मुलाला घरी सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने तपासावर परीणाम करेल. ⁠बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरु आहे. ते पूर्ण व्हायचे आहे. त्यासाठी त्याला इथेच ठेवावे. ⁠मुलाच्या घरी त्याची काळजी घ्यायला कोणी नाही त्यामुळे त्याच्या मनावर परीणाम होऊ शकतो. ⁠अल्पवयीन मुलाच्या जीवाला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात यावे.

दरम्यान, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलगा सध्या बाल सुधारगृहामध्ये आहे. तर याप्रकरणी आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल, ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोळ, शिपायी अतुल घटकांबळे, मुंबईतून अटक केलेले दोघेजण हे सर्वजण सध्या पोलिस कोठडीत आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT