Pune Porsche Accident News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Porsche Case: आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला, बाल न्याय मंडळाचे २ अधिकारी बडतर्फ

Pune Juvenile Justice Board: पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर बाल न्याय मंडळामध्ये हजर करण्यात आले होते. त्याला निबंध लिहायला सांगून सोडण्यात आले होते.

Priya More

Pune Porsche Accident News Updates: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळातल्या २ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. राज्य महिला आणि बाल विकास विभागाने ही कारवाई केली आहे. पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर बाल न्याय मंडळामध्ये हजर करण्यात आले होते. त्याला निबंध लिहायला सांगून सोडण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान पदाचा गैरवापर केल्यामुळे दोघांना बडतर्फ करण्यात आलं.

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गौरवापर केला त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्या दोन अधिकाऱ्यांची पोर्श कार अपघात प्रकरणात ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यावरून आणि १७ वर्षीय मुलाला जामीन मिळण्यावरून चौकशी करण्यात आली होती. या दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी ५ अधिकाऱ्यांची समिती देखील नेमण्यात आली होती.

चौकशी केल्यानंतर आणि सगळ्या पैलूंची पडताळणी केल्यानंतर जुलै मध्ये १५० पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता आणि त्यातच त्या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला होता. यांनतर विभागाने त्यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना बडतर्फ केले. कविता थोरात आणि एल एन धनावडे असं या बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत.

दरम्यान, पुण्यात १९ मे रोजी ही अपघाताची घटना घडली होती. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीला धडक देत दोघांना चिरडले होते. यामध्ये दोन इंजिनिअर्सचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. त्याला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिही आणि पोलिसांसह दोन आठवडे काम कर अशी अट घालत जामीन मंजूर केला होता. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला होता. त्यानंतर आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

SCROLL FOR NEXT