Pune Hit And Run Case  Pune Hit And Run Case
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलीय. या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा सुचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. याचदरम्यान अल्पवयीन चालक आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराने पोलिसांवर दबाव टाकला असल्याचा आरोप महिला आरटीआय अधिकाऱ्याने केलाय. महिला अधिकाऱ्याने केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडालीय.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका भरधाव कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी हा एका श्रीमंत व्यावसायिकाचा मुलगा आहे. अपघात प्रकरणात त्याला अटक झाल्यानंतर त्याला लागलीच जामीन मिळाला. याप्रकरणी चौकशी करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. तसेच पोलीस स्टेशनमध्ये असताना पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

या संदर्भातील दोषी कारवाई करावी, अशा सुचना फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिल्यात. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आरोपीला बर्गर आणि पिझ्झा खायला दिला असेल तर त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. ते फुटेज खरे असल्यास त्यावेळी कार्यकरत असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशा सुचना देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून पुणे पोलीस आयुक्तांनी दिल्यात.

याचदरम्यान पुण्यातील महिला माहिती अधिकारी विनीता देशमुख यांनी मोठा आरोप केलाय. व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला. हिट अॅण्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपी चालकाला वाचवण्यासाठी तेथील स्थानिक आमदार सुनिल टिंगरे हे येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यांच्या दबावानेच पोलीस त्याला वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत.

विनीता देशमुख यांनी केलेल्या आरोपांनुसार, रविंद्र टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी पोलिसांवर दबाव टाकत अल्पवयीन आरोपीला कोणता त्रास होऊ, नये म्हणून त्याला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा, बर्गर खाण्यास देण्यात असं त्या म्हणाल्या. आरोप करताना त्या म्हणाल्या माध्यामांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,आमदार टिंगरे यांनी या प्रकरणातील अनेक कलम जसे यातील ड्रिंक आणि ड्राईव्ह, सारखे कलमे काढून ही केस कमकुवत केली. ज्यामुळे आरोपीला पुढील आयुष्यात कोणताच त्रास होणार नाही.

परंतु ज्या दोन जणांचा मृत्यू झालाय त्यांचा उगीच जीव गेलाय. त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्यभर त्याचं दु:ख राहणार आहे. परंतु ही परिस्थिती वाईट आहे, सलमान खानच्या हिट अँण्ड रन प्रकरणापासून आपण पाहतो आहोत. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते लोक पोलीस यंत्रणा, राजकीय नेते, मीडियाला विकत घेऊ शकतात, असा आरोप त्यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

Marathi News Live Updates : आमदार बच्चू कडूंना मोठा धक्का; प्रहारचा आमदार शिंदे गटाने पळवला

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

Assembly Election: 'हरियाणा, काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकणार, महाराष्ट्रातही असंविधानिक सरकार पडणार', काँग्रेसला विश्वास

Maharashtra Politics : राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

SCROLL FOR NEXT