Dr Pallavi Saple in Sassoon Hospital Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident Update: SIT प्रमुख डॉ.पल्लवी सापळेंनी घेतली मंत्री मुश्रीफ यांची भेट, ससून रुग्णालय चौकशीचा अहवाल सोपवला

Sassoon Hospital News: ससून रुग्णालायातील डॉक्टरांच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली. या एसटीची जबाबदारी डॉक्टर सापळे यांच्यावर देण्यात आली. डॉ. सापळे यांनी आज हसन मुश्रीफ याची भेट घेतली.

Bharat Jadhav

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

पुणे: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात नव-नवीन वळण येत आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करणाऱ्या समितीच्या प्रमुख डॉ.पल्लवी सापळे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे चौकशीचा अहवाल सोपवलाय. रुग्णालयाची चौकशी केल्यानंतर साबळे यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली.

ससून रुग्णालायातील डॉक्टरांच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली. या एसटीची जबाबदारी डॉक्टर सापळे यांच्यावर देण्यात आलीय. डॉक्टर साृपळे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतलीय.ससून रुग्णालयात घडलेल्या प्रकरासंदर्भातील आपली बाजू देखील मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, ससूनमधील डॉक्टरांनी कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले होते. या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेतले आणि ते कचऱ्यात टाकले, त्यानंतर त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचे भासवत अहवाल दिला होता. या दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली असून ससून रुग्णालयाने या दोघांना निलंबित केलं आहे.

दरम्यान या डॉक्टरांच्या चौकशी सरकारने एक समिती नेमली होती. यात जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, मुंबईतील डॉक्टर गजानन चव्हाण, छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर सुधीर चौधरी समितीत आहेत. डॉ. सापळे ह्या या समितीच्या प्रमुख आहेत. डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी आलेल्या समितीतील डॉक्टरांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे ही समितीही वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. याचदरम्यान डॉ. सापळे यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेत चौकशीचा अहवाल त्यांच्याकडे सोपवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT