Pune Porsche Car Accident Case Saamtv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident Case : अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले, ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

Pune Porsche Accident Case news : ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अल्पवयीन तरुणासोबत कारमधील इतर मित्रांच्या रक्ताचे नमुने सुद्धा बदलल्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात नवनवीन माहिती उघड होत आहे. पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपी आणि मित्रांनी मद्य पिऊन गाडी चालवल्याने अपघात चालवल्याचा आरोप त्यांचावर होता. मात्र, ससून रुग्णालयात या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाच्या मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यामध्येही फेरफार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात नवनव्या माहिती उघड होत आहेत. या प्रकरणातीस बिल्डर विशाल अग्रवालचा मुलाच्या पोर्शे कारमधील इतर मित्रांच्या रक्ताचे नमुने देखील बदलल्याची माहिती उघड झाली आहे. पोर्शे कारमधील या मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश आढलले नाहीत. ससून रुग्णालयातील हा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अल्पवयीन आरोपीच्या २ मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. अजय तावरेने किती रक्कम घेतली, अशी चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसोबत २ मित्र देखील पब आणि हॉटेलमध्ये होते. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलले, याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ससून रुग्णालयात फेरफार करण्यासाठी बाहेरून आलेले ३ व्यक्ती कोण, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT