Pune Porsche Accident Case Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident Case : २०२५ पर्यंत 'ती' महागडी कार रस्त्यावर उतरवण्यास मनाई; त्या अल्पवयीन मुलाला या वर्षी मिळणार वाहन परवाना?

Pune Porsche Accident Case Update : पुणे अपघातातील पोर्शे कार २०२५ पर्यंत रस्त्यावर उतरवण्यास मनाई करण्यात आली आहे. तर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला २५ वर्षांपर्यत वाहन परवाना मिळणार नाही.

Sandeep Gawade

पुणे कल्याणीनगर परिसरात घटलेल्या भीषण पोर्शे कारच्या अपघातात प्रकरणात दररोज नवीन घडामोडी घडताये. दरम्यान अपघातग्रस्त पोर्शे कार २०२५ पर्यंत रस्त्यावर उतरवण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील वर्षापर्यंत प्रादेशिक परिवहन मंडळाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. तर २५ वर्षापर्यंत टत्याट अल्पवयीन तरुणाला वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

ही कार बेंगळुरूहून एका वाहन विक्रेत्यामार्फत आणली गेली होती. बेंगळुरू आरटीओकडे या कारची तात्पुरती नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र पुणे आरटीओकडे 1,758 रुपये नोंदणी शुल्क न भरल्याने कायमस्वरूपी नोंदणी पूर्ण करण्याची प्रक्रिया रखडली होती. दरम्यान बेंगळुरू आरटीओ सुद्धा या पोर्शे कारची नोंदणी रद्द करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी अपघातग्रस्त कारचा अहवाल लवकरच पाठवणार आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील तरुण- तरुणीचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. या भयंकर अपघाताने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गाडी चालवणारा तरुण हा शहरातील एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असून त्याला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला होता.

तर मुलगा अल्पवयीन असून देखील त्याला दारु देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्याच्या मुलाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

या अपघातामधील अल्पवयीन आरोपी आणि मित्रांनी दारू पिऊन गाडी चालवलं समोर आलं होतं. मात्र, ससून रुग्णालयात या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाच्या मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यामध्येही फेरफार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT