Pune Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यात काँग्रेस-शिवसेना अन् मनसे एकत्र निवडणूक लढवणार, जागा वाटपाचा तिढा सुटला; आज होणार घोषणा

Pune Municipal Corporation Election: पुणे महानगर पालिकेमध्ये काँग्रेस-शिवसेना अन् मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे फायनल झाले आहे. रविवारी रात्री तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली असून जागावाटपाचा तिढा देखील सुटला.

Priya More

Summary -

  • पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र

  • तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार

  • जागावाटपाचा तिढा देखील सुटला

  • आज संयुक्त पत्रकार परिषदेत घेत अधिकृत घोषणा होणार

पुण्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस- शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. रविवारी रात्री पुण्यामध्ये शिवसेना नेते सचिन अहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एकत्रित निवडणूक लढण्याबाबत निर्णय झाला आणि जागावाटपाचा तिढा देखील सुटला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे सोबत आले आहेत. तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते सतेज पाटील घोषणा करतील. जागावाटपाबाबत देखील अधिकृत घोषणा आज होणार आहे. पुणे महानगरपालिकेत काँग्रेस ८० जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना उबाठा आणि मनसे ६५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर १५ ते २० जागा मित्रपक्षासाठी सोडल्या जाणार आहेत. आज यावर काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि मनसेकडून अधिकृत घोषणा होईल.

पुण्यात सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची रविवारी रात्री बैठक झाली. जागा वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. मनसे नेत्यांनी देखील सतेज पाटील आणि सचिन अहिर यांची भेट घेतली होती. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये महत्वाची बैठक झाली. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा झाली आणि निर्णय देखील झाला. आज तिन्ही पक्ष संयुक्त पत्रकार परिषद घेत घोषणा करणार आहेत.

दरम्यान, पुणे महापालिकेत तिरंगी लढत होणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस- शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या सर्व मित्रपक्ष असे समीकरण असणार आहे. आज सर्व पक्षांकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपचा जागा वाटप तिढा अजून सुटला नाही. मात्र आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील युती आणि आघाडीबाबत आज अंतिम निर्णय होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

Akola : महायुतीत खोडा घालण्याचा प्रयत्न नक्की कोण करतंय? भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं

PM Kisan Yojana: एका कुटुंबातील किती जण घेऊ शकतात पीएम किसानचा लाभ? कोणाला मिळणार ₹६०००? वाचा नियम

Pimple Free Skin: चेहरा पिंपल्सने भरलाय? 'या' 5 घरगुती टिप्सने लगेचच करा उपाय

SCROLL FOR NEXT