Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा; आमदार, खासदारांचे फोटो लावत स्थानिकांनी विकास कामांबाबत विचारला सवाल

Political News: स्थानिक नेते नमेश बाबर यांच्या नेतृत्वात पदयात्रेला सुरूवात झाली. आमदार आणि खासदारांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलीच पाहिजेत अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Pune Political News:

पुण्यात (Pune) विकास कामांसाठी कात्रज कोंढवा रस्त्यावर अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाचे बॅनर लावत कात्रज कोंढवा रस्त्यावर स्थानिकांनी हे आंदोलन केलेय. आमदार आणि खासदारांनी भाषणात केलेल्या आश्वासनांचा पाढा वाचत परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, आमदार भीमराव तापकीर यांचे फोटो पोस्टर्सवर छापून हे आंदोलन केले जात आहे. सर्व लोकप्रतिनिधींच्या विधानावर टिप्पणी करत विकास कामांसाठी कात्रज कोंढवा भागातील स्थानिक नागरिक आता रस्त्यावर उतरलेत.

पदयात्रा काढत प्रशासन आणि सरकारचा नागरिकांकडून जाहीर निषेध

आमदार आणि खासदारांनी विकास कामांची आश्वासने पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. तुम्ही सगळेच म्हणाला होतात कात्रज कोंडवाचा विकास करणार. कुठे आहे आमचा विकास?, असा प्रश्न या बॅनरवर लिहिती संतप्त स्थानिकांनी लोकप्रतिनिधींना सवाल विचारला आहे.

यासह सुप्रिया सुळे (Supriya Sule) अमोल कोल्हे, भीमराव तापकीर यांनी आपल्या भाषणांमध्ये विकासकामांबाबत जी वक्तव्ये केली होती ती वक्तव्ये देखील यावर लिहिण्यात आलीत. कात्रजमधील स्थानिक आणि इतर संघटनांनी एकत्र येथे रस्त्यावर उतरून पदयात्रा काढली. यावेळी स्थानिक नेते नमेश बाबर यांच्या नेतृत्वात पदयात्रेला सुरूवात झाली. आमदार आणि खासदारांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलीच पाहिजेत अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

संतप्त नागरिकांचा रोष पाहून आमदार आणि खासदारांकडून आपली आश्वासने पूर्ण केली जाणार का? की पदयात्रेतील स्थानिक नागरिकांना आपल्या मागण्यांसाठी खरोखर आमरण उपोषण करावे लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT