Pimpri Chinchwad Political Shake-up Ahead of Municipal Elections Saam
मुंबई/पुणे

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Pimpri Chinchwad Political Shake-up Ahead of Municipal Elections: भाजप पक्षातील नगरसेवकांनी आणि नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे पुण्यात भाजपला मोठा धक्का बसलाय.

Bhagyashree Kamble

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी प्रतिक्रिया पार पडणार आहे. 'राज्यात सर्वच ठिकाणी शिंदेंची शिवसेना भाजप पक्षासोबत असेल. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार', असं मुख्यमंत्री म्हणाले.

अशातच मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाट धरली आहे. भाजपच्या नगरसेविका आणि काही शिवसेनेतील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. तसेच पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनीही राष्ट्रवादीची वाट धरली.

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेनेच्या शहरप्रमुख रूपाली आल्हाट, शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सीमा सावळे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, भाजपच्या अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण लढत

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या सरकारने केलेलं काम पाहता मुंबईसह सगळ्याच ठिकाणी जनतेचं कौल आमच्या बाजूने असेल', असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 'राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप तसेच शिंदेंची शिवसेना एकत्र लढेल. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात लढणार. ही लढत मैत्रीपूर्ण असणार', असं फडणवीस म्हणाले.

'पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप एकत्र लढू शकणार नाहीत. याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही जर एकत्र लढलो तर, त्याचा फायदा विरोधकांना होणार. इतकं राजकारण आम्हा दोघांनाही समजतं. यामुळे हे दोन्ही पक्ष विरोधात लढणार असून, ही लढत मैत्रीपूर्ण असणार', असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Roasted Papad Side Effects: तुम्हीही पापड भाजून खाताय? मग होऊ शकतात हे गंभीर आजार, सवय आजच बदला

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT