Police team responds after coming under fire during an operation to nab accused in Pune’s Shirur area. Saam tv
मुंबई/पुणे

पुणे हादरलं! आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार

Police Team Attacked During Raid In Shirur Pune: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव जवळील सोने सांगवी येथे एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले असता हा प्रकार घडला. पोलिसांनीही प्रत्युत्तर देत हवेत गोळीबार स्वसंरक्षणार्थ केला. सुदैवाने या थरारात कोणीही जखमी झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस दल एका गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या मागावर होते. तपासादरम्यान आरोपी सोने सांगवी( ता.शिरूर) परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.पोलीस जवळ येत असल्याचे पाहताच दोन आरोपीनी पोलिसांच्या दिशेने थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. पोलिसांनीही तत्परता दाखवत स्वसंरक्षणार्थ आरोपींवर गोळीबार केला.

दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारानंतर आरोपींनी पोलिसांना गुंगारा देत शेजारीच असलेल्या ऊसाच्या घनदाट शेताचा आसरा घेतला आणि तेथून पलायन केले. ऊसाचे शेत मोठे असल्याने आरोपींना शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि अतिरिक्त फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. संपूर्ण सोने सांगवी परिसराला पोलिसांनी वेढा घातला असून, ऊसाच्या शेतात लपलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी कोम्बिंग ऑपरेशन (शोध मोहीम) सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे रांजणगाव आणि शिरूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak : पंतप्रधान मोदींनी तात्काळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, नीट पेपरफुटीवर राहुल गांधी भडकले!

Maharashtra News Live Update: नागपूर प्रेस क्लब समोर कारला बसची धडक

Sunday Horoscope: काहींना आर्थिक लाभ, तर या ४ राशींच्या कामाच्या अडचणी होणार दूर; वाचा रविवारचे राशीभविष्य

बीडमधील हिंगणी तलावात होडी उलटली; दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

नक्षलवादाला मोठा झटका; गडचिरोलीत ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ यशस्वी; माओवादी जाळं उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT