मुंबई/पुणे

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Pune News : दहावीच्या विद्यार्थिनीने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी मार्शल हिंगे यांनी तत्परतेने मदत केली. विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतली. विद्यार्थिनीचा मानसिक तणाव दूर झाला आणि ती आनंदी झाली.

Akshay Badve

  • दहावीच्या विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलिसांना फोन करून मदतीची विनंती केली.

  • दामिनी मार्शल हिंगेंनी तत्काळ धाव घेत विद्यार्थिनीला धीर दिला.

  • मुलीच्या पालकांमध्ये घटस्फोटाचा खटला सुरू असल्याने ती मानसिक तणावाखाली होती.

  • पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पालकांनी भांडण बाजूला ठेवत घटस्फोटाची याचिका मागे घेतली.

  • विद्यार्थिनी आणि कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले.

दहावीत शिकणाऱ्या मुलीचा शिवाजीनगर पोलिसात फोन आला अन् एकच धावपळ उडाली. मुलीने मोठ्या हिंमतीने पोलिसाना फोन करून मदतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर दामिनी मार्शलकडून मुलीसोबत संपर्क साधत तिचे मन परिवर्तन केले. "दीदी, मला तुमच्या मदतीची गरज आहे" असे म्हणत दहावीच्या मुलीने कळकळची विनंती केली. त्यावर पुणे पोलिसांकडूनही तात्काळ मदत करण्यात आली.

पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दामिनी मार्शल यांनी दहावीच्या मुलीला मदत केली. घर सोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थिनीचे मनःपरिवर्तन केले. शाळेतील विद्यार्थिनीचे घर सोडून जाण्याचे निर्णयाबाबत मनःपरिवर्तन करून कुटुंबाला मदत केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्त असलेल्या दामिनी मार्शल पोलिस शिपाई हिंगे यांनी मुलीची समजूत घातली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० ते १०.१५ च्या दरम्यान हिंगे यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणारी एक मुलगी म्हणाली, "दिदी, मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी घर सोडून चालले आहे. मला खूप टेन्शन आहे." चौकशीदरम्यान दामिनी मार्शल यांना समजले की ही मुलगी शालेय विद्यार्थिनी असून इयत्ता दहावीत आहे.

दरम्यान, या विद्यार्थिनीचे आई-वडील एकत्र राहत नसल्याने आणि त्यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू असल्याने घरगुती वादामुळे ती मानसिक तणावाखाली होती. हिंगे यांनी तात्काळ या विद्यार्थिनीची भेट घेण्यासाठी धाव घेतली. भेटीनंतर तिला धीर दिला आणि नंतर तिच्या शाळेत जाऊन प्राचार्यांची भेट घेतली. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली. चर्चेनंतर मुलीच्या पालकांनी आपले भांडण बाजूला ठेवून घटस्फोटाची याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विद्यार्थिनी अत्यंत आनंदी झाली असून तिने, तिच्या पालकांनी तसेच शाळेच्या प्राचार्यांनी दामिनी मार्शल व पुणे शहर पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Maharashtra Live News Update : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

आदिवासींकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, अनेक पत्रकार, पोलीस जखमी; नेमकं काय घडलं? VIDEO

IND vs AUS: विराट-रोहितचा युग संपला, २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही? कुणी दिले संकेत

Chhagan Bhujbal: ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री छगन भुजबळ आक्रमक|VIDEO

SCROLL FOR NEXT