Pune Pub Raid Latest Marathi Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात पहाटे ३ वाजेपर्यंत रंगली पार्टी! पबवर पुणे पोलिसांची छापेमारी; ८० ते १०० तरुण-तरुणी ताब्यात

Pune Pub Raid Latest Marathi : पुणे विमानतळ परिसरातील द हौज कम्युन पबवर गुन्हे शाखेने पहाटे ३ वाजता छापा टाकला. नियमांचे उल्लंघन करून पार्टी सुरू असल्याचे आढळल्यानंतर ८० ते १०० जणांना ताब्यात घेण्यात आले.

Akshay Badve

Pune police raid pub at 3 AM : पुणे शहरातील विमानतळ परिसरातील नामांकित 'द हौज कम्युन' (The Haus Commune) या पबवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे तीन वाजता अचानक धाड टाकली. या छापेमारीदरम्यान पबमध्ये सर्रास पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले. प्रशासनाने रात्री दीड वाजेपर्यंतच पब सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली असतानाही, हा पब पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता.

पोलीस कारवाईच्या वेळी पबमधील डान्स फ्लोअरवर सुमारे ८० ते १०० तरुण-तरुणी बेधुंद होऊन नाचत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पबचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेची धडक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ भागातील या पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास अचानक छापा टाकला. त्यावेळी अनेक तरुण-तरुणी डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नृत्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कोणाच्या आशीर्वादाने पब सुरू? पोलिसांकडून चौकशी

पुणे शहरात पब आणि क्लब सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली आखून दिली असून रात्री दीड वाजेची मुदत निश्चित केली आहे. असे असतानाही पहाटे तीन वाजेपर्यंत हा पब कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसेच, या ठिकाणी दारू विक्रीचा अधिकृत परवाना होता की नाही, याबाबतही पब चालकाची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT