pune police raid budhwar peth red light area Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बुधवार पेठेत छापेमारी, पाच बांगलादेशी महिलांना अटक

Pune Crime News : पुण्याच्या बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये पोलिसांना ५ बांगलादेशी महिला आढळून आल्या. या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुण्यामध्ये अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलांना पकडण्यात आले आहे. पुण्याच्या बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये छापा टाकून पोलिसांनी या महिलांना पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. या महिला अवैधरित्या, कोणत्याही परवान्याशिवाय देशात घुसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील बुधवार पेठ रेड लाईट एरियामधील मालाबाईचा वाडा येथे काही बांगलादेशी महिला अवैधरित्या राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करुन मालाबाईचा वाडा येथे छापा टाकला. या छाप्यामध्ये ५ बांगलादेशी महिलांना पकडण्यात आले.

पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा या सर्व महिला अवैधरित्या, विनापरवाना भारतात घुसल्या, त्या स्वखुशीने वेश्याव्यवसाय करुन त्यांची उपजीविका भागवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या महिला बांगलादेशी असल्याचे पुरावे गोळा करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जहानारा मजिद शेख (वय ४५ वर्षे), शिल्पी बेगम रबिउल्ला शेख (वय २८ वर्षे), नुसरात जहान निपा (वय २८ वर्षे), आशा खानाम इयर अली (वय ३० वर्षे) आणि शिल्पी खालेकमिया अक्तर (वय २८ वर्षे) असे बांगलादेशातून भारतात पळून आलेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणात फरासखाना पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag KYC: तर तुमचं FASTag होणार कायमचे बंद; कारण काय? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कुठलीही बॅग, पिशवी, बाटली नेण्यास बंदी

Mumbai : ऑटोमध्ये पिटबुलने मुलाच्या मानेचे लचके तोडले, वाचवण्याऐवजी मालक खिदळत राहिला

Latur Band : छावाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याची बेदम मारहाण, राज्यात पडसाद, आज लातूर बंद

Horoscope Monday Update: कामिका एकादशीचे व्रत फलदायी ठरेल, प्रगतीची आस राहील; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT