Pune Crime : पुण्यात पुन्हा हाणामारी! कार पार्किंगचा वाद टोकाला, तरुणाला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण

Parking Dispute Pune: पुण्यातील पर्वती परिसरात एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Parking Dispute Pune
Parking Dispute PuneSaam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुण्यात पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वती परिसरात युवकावर टोळक्याकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि मारहाण करणारे एकाच ठिकाणी राहत असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या पर्वती भागात १० ते १२ जणांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण केल्याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Parking Dispute Pune
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि मिनी बस आदळल्या; दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा

पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद करणारा तरुण आणि त्याला मारहाण करणारे हे पुण्यात एकाच इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यांमध्ये गाडीच्या पार्किंगवरुन वाद सुरु होता. या वादावरुन परवा १६ जुलै रोजी १०-१२ जणांकडून त्या तरुणाला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर तरुणाने पर्वती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Parking Dispute Pune
Pune Accident : पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, खराब रस्त्यावरुन घसरली अन् बस थेट गटारात कोसळली

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा राडा

पुण्यात एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत राडा घातला होता. ही महिला नशेत नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. मला माझी आई बोलावत आहे, असे म्हणत महिला राडा घालत असल्याचे पाहायला मिळाले. शिवाजीनगर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. पंधरा ते वीस मिनिटे महिलेने नदी परिसरामध्ये गोंधळ घातला होता.

Parking Dispute Pune
Pune : पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा राडा, नशेत नदीपात्रात उडी मारणार तेवढ्यात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com