Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि मिनी बस आदळल्या; दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस आणि मिनी बस एकमेकांना आदळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway AccidentSaam Tv
Published On

अमोल कलये, साम टीव्ही, प्रतिनिधी

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावर संगमेश्वरमधील ओझरखोल येथे एसटी बस आणि मिनी ट्रॅव्हलर बस यांच्यामध्ये अपघात झाला आहे. दोन्ही बसेस एकमेकांच्या समोरुन येत होत्या. समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

रत्नागिरीतील संगमेश्वरच्या ओझरखोल येथे एसटी बस आणि मिनी बस यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. एसटी बस ही रत्नागिरीवरुन चिपळूणच्या दिशेने जात होती. तर मिनी बस ही रत्नागिरीच्या दिशेने पुढे येत होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Mumbai Goa Highway Accident
Pune Accident : पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, खराब रस्त्यावरुन घसरली अन् बस थेट गटारात कोसळली

एसटी बस आणि मिनी बसच्या धडकेमध्ये दोन्ही वाहनांमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिनी बसचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी चालकाला प्राथमिक उपचारांनंतर रत्नागिरीला हलवण्यात आले आहे.

Mumbai Goa Highway Accident
Jitrendra Awhad : विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल तर... विधान भवनातील हाणामारीवर जितेंद्र आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस आणि मिनी बस यांची धडक इतक्या जोरात झाली, ही दोन्ही वाहनांच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. यात मिनी बसचा चालक हा बसच्या कॅबिनमध्ये अडकला गेला. त्याला कॅबिनमधून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आली. अर्धा तासानंतर चालकाला बाहेर काढण्यात आले.

Mumbai Goa Highway Accident
Eknath Shinde : मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणणार, सामान्यांना घर मिळवून देणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com