Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : 'भाई होण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा', पुणे पोलिसांचा गावगुंडांना सज्जड दम

Pune Police : पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन गावगुंडाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांनी एका व्यक्तीला विनाकारण मारहाण केली होती. दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना अद्दल घडवली.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे : काही दिवसांपूर्वी प्रकाश सिद्धप्पा सोनकांबळे आणि अहमद शब्बीर शेख या दोघांनी काही कारण नसताना एका व्यक्तीला दगडाने आणि धारदार शस्त्राने मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी हवेत शस्त्र फिरवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांनी शोध घेऊन काल शनिवार १७ मे रोजी पर्वती टेकडी परिसरात दोघांना ताब्यात घेतले. मैत्रिणीला भेटायला जात असताना प्रकाश आणि अहमद पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचीही बिबवेवाडी पोलीस परिसरात वरात काढली. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाई होण्याचा प्रयत्न कराल, तर याद राखा असा दम पुणे पोलिसांनी दोघांना दिला आहे.

पुणे पोलिसांची मारणे गँगवर कारवाई

पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून ॲक्शन मोडवर आहेत. काल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गजा मारणे टोळीला दणका दिला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजा मारणे टोळीतील सदस्यांच्या गाड्या जप्त केल्या. यात गजा मारणेच्या गाड्यांच्या समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

दोन टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन यांच्यासह आणखी ४ चारचाकी गाड्या जप्त पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याशिवाय टोळीतील सदस्यांच्या दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांनी मारणे टोळीच्या १० ते १५ गाड्या जप्त केल्या आहेत. मारणे टोळीवर पोलिसांची बारीक नजर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT