पुण्यातला गॅगस्टर निलेश घायवळनं पुणे पोलिसांना गुंडाळून थेट परदेशात पळ काढलाय.. या घायवळवर काही दिवसांपूर्वी कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला.. मात्र मकोका लागल्यावर जेव्हा पोलिस त्याला पकडायला गेले आणि तेव्हा घायवळ देश सोडून थेट स्विर्त्झलंडला पळाल्याचं पोलिसांनी कळलं..
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल खंडणी, टोळीयुध्द, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं असे गुन्हे ज्याच्या नावावर आहेत असा हा गॅगस्टर घायवळ परदेशात गेलाच कसा? तर याचं उत्तर आहे झोपलेली पोलीस यंत्रणा...पोलिसांच्या हातावर तुरी देत घायवळ थेट परदेशात पळून गेला....
गंभीर गुन्हे असल्यानं पासपोर्ट मिळणार नाही हे ओळखून घायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील खोटा पत्ता वापरला.. 2019 च्या डिसेंबरमध्ये त्यानं पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला. . त्यासाठी त्याने नावात देखील बदल केला. निलेशने त्याच आडनाव घायवळ ऐवजी 'गायवळ' असं अर्जावर लिहलं.
त्यानंतर कोतवाली पोलीसांकडे घायवळचा अर्ज पाठवण्यात आला.. त्यानंतर घायवळनं दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्यानं कोतवाली पोलीसांनी पासपोर्ट कार्यालयाला "Not available" एवढाच अभिप्राय पाठवला. तर 2021 ला पुण्यातील दरोडा प्रकरणानंतर घायवळला न्यायालयानं पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले. मात्र तरीही पोलिसांनी पासपोर्ट जमा करून घेतला नाही...त्यातच याचं पासपोर्टचा वापर करून घायवळ लंडनला गेला आणि तिथून तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती आहे.
मात्र घायवळसारखा गुन्हेगार पासपोर्टसारखे महत्त्वाचे कागदपत्र तयार करून त्याचा वापर करेपर्यंत पुणे पोलिस नेमकं काय करत होते? पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये पोलीसांनी नेमकं काय केलं.. त्याचं नाव बदलेलं त्यांना कळलंच नाही की त्याकडे कुणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं..मकोका मधला आरोपी एवढा सगळा खटाटोप करतो आणि पोलिस यंत्रणा झोपेत असते ? पोलिस प्रशासन झोपण्याचं सोंग करून एका आरोपीला पाठिशी तर घालत नाही ना? की घायवळविरोधात कारवाईची धमक खाकीमध्ये नाही? असे सवाल निर्माण होतायत... मात्र पुण्यातल्या वाढत्या गुंडगिरीला पुणे प्रशासनाचा हा हलर्गीपणाचा कारणीभूत आहे, हे नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.