pune police introduce night restrictions Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात रात्री १० नंतर अंडा भुर्जी, चायनीज, पान टपऱ्या बंद; पोलीस आयुक्तांचे कडक आदेश

Pune Street Food News : पुणे शहरात खाऊ गल्ली, पान टपऱ्या, अंडा भुर्जी आणि चायनीजच्या हातगाड्यांसह सर्व अस्थायी आस्थापनांना रात्री १० वाजता बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Akshay Badve

Pune police order for food stalls after 10 PM : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार, शहरातील सर्व खाऊ गल्ल्या, हॉकर्स, पान टपऱ्या, अंडा भुर्जी आणि चायनीजच्या हातगाड्या यांसारख्या सर्व अस्थायी आस्थापना रात्री १० वाजताच बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तांनी याबाबतचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत. रात्रीच्या वेळी होणारी गर्दी आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या खाद्यसंस्कृतीला आता रात्री १० वाजताच ब्रेक लागणार आहे.

स्थायी आस्थापनांना रात्री १० वाजण्याची मर्यादा नाही. पण पुण्यातील पान टपऱ्या, अंडा भुर्जी आणि चायनीजच्या हातगाड्या रात्री १० वाजता बंद करण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. खाऊ गल्ली, हॉकर्स, फिरत्या स्वरूपातल्या हातगाड्या यासह अस्थायी आस्थापना रात्री १० वाजता बंद करणे अनिवार्य कऱण्यात आले आहेत. याबाबत पुणे शहर पोलिसांकडून स्पष्ट आदेश जारी केले आहेत. आस्थापना बंद करताना त्यात प्रवेश करू नये आणि अक्कार्यालयीन भाषेचा प्रयोग करू नये, अशा सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयानंतर आता छोट्या व्यावसायिकांकडून यावर काय तोडगा काढला जाऊ शकतो याचा विचार केला जात आहे. पुण्यात रात्री 10 नंतर मोठ्या प्रमाणावर नाईट लाईफ किंवा नोकरदार वर्ग जेवणासाठी बाहेर फेरफटका मारत असतो. प्रत्येकालाच महागडे कॅफे किंवा रेस्टॉरंट परवडत नसल्यामुळे हातगाड्यांवर मिळत असलेली अंडा भुर्जी चायनीज हे सोयीचे पर्याय ठरतात. रात्री दहा नंतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची किंवा नाईट शिफ्ट करून घरी परतताना जाणाऱ्या नोकरदार वर्गांची अशा छोट्या अस्थायी आस्थापनांवर मोठी गर्दी होते. दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक सुद्धा चिंतीत झाली आहेत. मोठी जागा घेणे परवडत नाही तसेच सध्या सगळ्याच गोष्टीचे दर वाढल्यामुळे आहे त्या जागांवरच आम्ही व्यवसाय करतो आता त्यात असा निर्णय होत असेल तर निश्चितपणे आमच्यासारख्या व्यवसाय करणाऱ्यांना आहे ते दुकानं बंद करावे लागतील अशी प्रतिक्रिया एका चायनिज सेंटर चालवणाऱ्या ने दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT