Pune Traffic Change News saamtv
मुंबई/पुणे

Pune Breaking : पुण्यात उद्यापासून संध्याकाळी ५ नंतर हे प्रमुख रस्ते बंद, गणेशोत्सवात वाहतूक कोंडी फुटणार!

Pune Traffic News : उद्यापासून शहरातील प्रमुख रस्ते १८ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी पाच नंतर बंद करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Saam Tv

Pune Ganpati Festival : घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यास होणारी गर्दी बघता पुणे शहरातील मध्यभागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारपासून (ता.११) हा निर्णय लागू होणार असून सायंकाळी ५ नंतर रस्ते बंद ठेवले जाणार असल्याचे वाहतूक शाखेच्या पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. १८ सप्टेंबरपर्यंत हे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. यातून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी हा नियम लागू असणार आहे.

दरवर्षी घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यास गर्दी होते. त्यामुळे गुरूवारपासून पुणे शहराच्या मध्यभागात प्रचंड गर्दी होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.

ही शक्यता लक्षात घेता विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच देखावे बघण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांचे हाल होऊ नये यासाठी घेतलेल्या या निर्णयानुसार गुरुवारपासून शहराच्या मध्यभागात प्रचंड गर्दी होण्याच्या शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीपर्यंत पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

रस्ते कोणते?

लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, सणस रस्ता, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक रस्ता वाहतुकीस संध्याकाळी पाचनंतर बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

उद्यापासून हे रास्ते राहणार बंद

लक्ष्मी रस्ता,

छत्रपती शिवाजी रस्ता,

बाजीराव रस्ता,

टिळक रस्ता,

सणस रस्ता,

शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक रस्ता.

गणेश भक्तांसाठी पार्किंगची विशेष सोय

देखावे बघण्यासाठी आणि गणपती दर्शनासाठी होणारी गर्दी बघता पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील २७ मोक्याच्या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे.

गोगटे प्रशाळा, नारायण पेठ (दुचाकी)

SSPMS शिवाजीनगर (दुचाकी आणि चारचाकी)

S.W.कॉलेज (दुचाकी आणि चारचाकी)

PMPL मैदान, सारसबाग (दुचाकी)

पेशवा पार्क, सारसबाग (दुचाकी)

हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी)

पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी)

पार्वती ते दांडेकर पूल (सायकल)

दांडेकर पूल ते गणेश माला (दुचाकी)

गणेश माला ते राजाराम पूल (दुचाकी)

निलयम सिनेमा (दुचाकी आणि चारचाकी)

विमलाबाई गरवारे प्रशाळा (दुचाकी)

गरवारे कॉलेज, कर्वे रोड (दुचाकी आणि चारचाकी)

संजीवनी हॉस्पिटल, कर्वे रोड (दुचाकी आणि चारचाकी)

आपटे प्रशाळा (दुचाकी)

फर्ग्युसन कॉलेज (दुचाकी आणि चारचाकी)

जैन हॉस्टेल, BMCC रोड (दुचाकी आणि चारचाकी)

मराठवाडा कॉलेज (दुचाकी)

पेशवा पथ (दुचाकी)

रानडे पथ (दुचाकी आणि चारचाकी)

कॉंग्रेस भवन रोड, शिवाजीनगर (दुचाकी)

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड (दुचाकी आणि चारचाकी)

भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी आणि चारचाकी)

न्यू इंग्लिश स्कूल, रमण बाग (दुचाकी)

शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ (दुचाकी आणि चारचाकी)

H.V.देसाई कॉलेज (पोलिस पार्किंग)

हमालवाडा, नारायण पेठ (दुचाकी आणि चारचाकी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT