pune news Saam tv
मुंबई/पुणे

पुणे जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! ९ सराईत गुंडांवर एकाचवेळी मोठी कारवाई

pune police news : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ९ गुंडांवर थेट तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

पुणे पोलिसांची ९ गुंडांवर केली मोठी कारवाई

दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्यातून केलं तडीपार

खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये या गुंडांचा सहभाग

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. 'दादा' समजत दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आलाय. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी थेट तडीपार केलंय. शहरातील 9 गुंडांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केलंय. शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव ,मार्केटयार्ड आणि शहरातील इतर परिसरात गुंड दहशत माजवत होते. या 9 गुंडाना दोन वर्षांसाठी तडीपार केलंय. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे.

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी कडक पावले उचलायला सुरुवात केलीये. या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर गुन्हेगारी टोळींच्या दहशतीमुळे पुणेकर भयभीत झालेत. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने नऊ जणांना तडीपार करण्यात आल्याचं समोर आलंय.

९ गुंडावर आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे समोर आली आहे. यातील बहुतेक गुन्हेगार देखील २० ते ३० वयोगटातील आहेत .

गुन्हेगारांची नावे

जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर),

अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय २६, रा. अप्पर बिबवेवाडी),

ओंकार लक्ष्मण सणस (वय २३, रा. बिबवेवाडी),

राजु महादेव डेंगळे (वय २२, रा. सुखसागर नगर),

आकाश गुलाबराव कांबळे (वय २१, रा.),

कृष्णा बबन लोखंडे (वय २४, रा.),

आर्यन बापु बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक),

सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड),

साहिल भिमा अष्टगे (वय २०, रा. मार्केटयार्ड)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT