pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Pune : नाशिकनंतर पुण्यात पोलिसांकडून कारवाईचा धडाका; १८ सराईत गुन्हेगार तडीपार, नावे आली समोर

Pune Police News : नाशिकनंतर पुण्यात पोलिसांकडून कारवाईचा धडाका लावलाय. पोलिसांकडून १८ सराईत गुन्हेगारांना तडीपार केलंय.

Vishal Gangurde

नाशिकनंतर आता पुणे पोलिसांनीही गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा धडका

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १८ सराईत गुन्हेगारांना केलंय तडीपार

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केली कारवाई

गुन्हेगारांविरुद्ध हातभट्टी, फसवणूक, दरोडा, मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद

सचिन जाधव, साम टीव्ही

नाशिकमध्ये कुख्यात गुंड आणि गुन्हेगारी स्टाईल रिल्स तयार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. नाशिकनंतर आता पुणे पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरतील गुन्हेगारांवर कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी १८ सराईत गुन्हेगारांना तडीपार केलं आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड, ग्रामीणच्या हद्दीतून तडीपार केलं आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून १८ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी काढला आहे. परिमंडळ पाचच्या कार्यक्षेत्रात हडपसर, काळेपडळ, वानवडी, बिबवेवाडी, लोणी काळभोर, मुंढवा आणि फुरसुंगी पोलिस ठाण्यांचा समावेश होतो.

या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील काही महिन्यांत २२ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यांतर्गत ७८ गुन्हेगारांना अटक करण्यात आलीये. ५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. गुन्हेगारांवर हातभट्टी दारू विक्री, फसवणूक, सरकारी कामकाजात अडथळा, मारहाण, जबरी चोरी, दरोडा अशा विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

काळेपडळ पोलिस ठाणे : विनायक अधिकराव लावंड (वय ३१), शुभम सुदाम वीरकर (वय २५). हडपसर : रोहन सोमनाथ चिंचकर (वय २७, रा. गाडीतळ), बापू सुरेश मकवाना (वय २१, रा. गोसावी वस्ती). मुंढवा : अनिकेत राजेश शेलार (वय २२), दत्ता गणेश गायकवाड (वय ३६, रा. केशवनगर), दीपक गणेश गायकवाड (वय ३८, रा. केशवनगर). फुरसुंगी : अमोल राजेंद्र तट (वय ४५, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर)

कानिफनाथ शंकर घुले (वय ४९, रा. महम्मदवाडी), प्रमिला सर्विन काळकर (वय ४१). वानवडी : रफीक ऊर्फ टोपी महमूद शेख (वय ५५, रा. कोंढवा), गब्बू ऊर्फ सनी प्रकाश परदेशी (वय ३३, रा. वानवडी गाव). कोंढवा : मौलाना रसूल शेख (वय २२), गणेश तुकाराम घावरे (वय २८). बिबवेवाडी : अविनाश अर्जुन जोगन (वय २७), सारंग बबन गायकवाड (वय ३०). लोणी काळभोर : उमेश निवृत्ती राखपसरे (वय ५०, रा. थेऊर फाटा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT