Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यातील गुंडगिरी, भाईगिरी संपणार? पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

Mapping Vandalism Areas Pune: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. आता या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे 'मॅपिंग' करण्याचे आदेश दिले आहेत.

Rohini Gudaghe

Akshay Badwe

Latest Pune News

पुणे (Pune) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा (crime news) आलेख वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. आता या प्रकरणी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे 'मॅपिंग' करा, असे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. (Latest Marathi News)

पुणे शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येरवडा, मुंढवा यासह काही भागात मागील काही दिवसात वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना बंद झाल्या पाहिजेत, अशी भूमिका आता पुणे पोलिसांनी घेतली आहे. या घटनांशी संबंधित आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश (Pune Police Commissioner Order) देण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे शहरात वाहनांची तोडफोड

२६ फेब्रुवारी रोजी कोयता गँगच्या गुंडांनी येरवडा परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली होती. आरोपींच्या हातात कोयता तसंच हॉकी स्टिक असल्यानं नागरिक चांगलेच धास्तावले (Vandalism Areas Pune) होते.

१९ फेब्रुवारी रोजी पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांनी येरवडा परिसरात वाहनांची तोडफोड केली होती. हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याच्या इराद्याने आलेल्या ५ जणांच्या टोळक्याने येरवडा परिसरात (Pune) उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली होती.

पुणे ड्रग्ज प्रकरण

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी शहरात मोठे ड्रग्ज रॅकेट असल्याचं समोर आलं आहे. तेव्हापासून मोठी खळबळ उडाली (vehicles vandalized) आहे. शहरातील ड्रग्ज तस्करांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहेत.

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती. लंडनमध्ये दिल्लीतून १४० किलो मफेड्रोन ड्रग्जची तस्करी करण्यात आली, अशी कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT