Pune Amitesh Kumar Action Mode: पुण्यातील कोयता गँगची दहशत मोडणार; पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी दिले स्पष्ट संकेत

Pune Amitesh Kumar News: मागील दोन दिवसांत पुणे पोलीस आयुक्तांनी रेकॉर्डवरील गुंड आणि गुन्हेगारांची ओळख परेड घेतली. त्यानंतर नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगची दहशत मोडणार असल्याचे संकेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
Pune Amitesh Kumar Action Mode
Pune Amitesh Kumar Action ModeSaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे

Pune Amitesh Kumar on Koyta Gang :

अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अॅक्शन मोडवर काम करत आहेत. शहरातील गुन्हेगारी आणि गुंडगिरीला लगाम लावण्यासाठी जोरदार काम सुरु केलं आहे. मागील दोन दिवसांत पुणे पोलीस आयुक्तांनी रेकॉर्डवरील गुंड आणि गुन्हेगारांची ओळख परेड घेतली. त्यानंतर नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगची दहशत मोडणार असल्याचे संकेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. (Latest Marathi News)

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले,' काल आणि आज जे गुन्हेगार रेकॉर्डवर आहेत, त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. प्रतिबंधक वृत्ती नियंत्रण आणण्याची कारवाई आहे. गुन्हेगार सोशल मीडिया वापरत आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे.

'आता गुन्हे करायचा प्रयत्न झाला किंवा खंडणी घेण्याचा प्रयत्न करेल त्यावर कारवाई होईल. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर असणार आहे. गुन्हेगाराकडे शस्त्र कुठून येतात, याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल. आज अंदाजे दीडशेच्यावर गुन्हेगार आहेत, असेही ते म्हणाले.

Pune Amitesh Kumar Action Mode
Akola Crime News: रस्त्यावर आढळले दोन मृतदेह; अकोल्यातील खळबळजनक घटना

'गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळतं हे म्हणणं चुकीचं आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कायद्याचा दणका पाहायला मिळेल. रिल्स करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. दबंगगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. वाहतूक हा देखील मोठा विषय आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाईल. हेल्मेट सक्ती नाही पण हेल्मेट वापरण्यासाठी पुणेकरांमध्ये जनजागृती केली जाईल. जशी वेळ येईल तशी हेल्मेट सक्ती होईल. हेल्मेट सक्ती बाबत कोर्टाचा आदेश आहेच, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Amitesh Kumar Action Mode
Akola Crime News: रस्त्यावर आढळले दोन मृतदेह; अकोल्यातील खळबळजनक घटना

'स्वाती मोहोळ धमकी प्रकरणी तपास केला जात आहे. त्यांना सोशल मीडियावरून धमक्या आल्या आहेत. त्याचा तपास सुरू आहे.कोयता गँग असो वा कुठलेही गुन्हेगार असोत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com