Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : पुणे पोलीस आयुक्तांचा मारणे टोळीला दणका, गुन्हे शाखेने केली मोठी कारवाई

Pune Police : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गजा मारणे टोळीला दणका दिला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीवर कारवाई केली आहे.

Yash Shirke

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीला दणका दिला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्या आहेत. मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील अन्य सदस्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यत पुणे पोलिसांकडून मारणे टोळीच्या १० ते १५ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीवर कारवाई केली आहे. दोन टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन यासह आणखी ४ चारचाकी गाड्या जप्त पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेने टोळीतील सदस्यांच्या दुचाकीसुद्धा जप्त केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून गजा मारणे आणि मारणे टोळी चर्चेत आहेत.

गजा मारणेची मटण पार्टी

काही महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहातून गजा मारणेला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात येणार होते. त्यानंतर त्याला सांगली कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. गजा मारणेला घेऊन पोलीस व्हॅन सांगलीच्या दिशेने निघाली. पण थेट कारागृहात जाण्यापूर्वी ती एका ढाब्यावर थांबली. साताऱ्यात असलेल्या ढाब्यावर व्हॅन थांबली आणि आरोपी असूनही गजा मारणेने ढाब्यावर मटणाचे जेवण केले.

गजा मारणेची मटण पार्टी पुणे पोलिसांना भोवली. पोलीस दलातील १ अधिकाऱ्यासह ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सांगली कारागृहात जाताना पोलीस असताना मारणेने मटण पार्टी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलीस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT