PMPML Saam TV
मुंबई/पुणे

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, PMPML च्या ५० बसेसच्या मार्गात बदल, वाचा सविस्तर

PMPML Bus : पुण्यामध्ये उद्या पीएमपीच्या बसेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहूनच निघा, अन्यथा नाहक त्रासाचा सामना करावा लागेल.

Namdeo Kumbhar

Pune Bus News : गुरूवारी संपूर्ण पुण्यामध्ये पाणीकपात होणार आहे. त्यामुळे पुणेकर चिंतेत आहेत. त्यातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी पुणेकरांसाठी समोर आली आहे. बुधवारी पुण्यात २० बसेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय. त्यामुळे उद्या घराबाहेर पडण्याआधी बसचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. अन्यथा नाहक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. पुणे महानगर पालिकेच्या वतीने बुधवारी पादचारी दिनाचे आयोजन करण्यात आले, त्यामुळे ५० बसेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय. (Pune's Laxmi Road to Host Pedestrian Day )

पुण्यामध्ये बुधवारी पीएमपीच्या ५० बसेसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्यावतीने उद्या पादचारी दिनाचे आयोजन केले आहे. त्या दिनानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावर 'वॉकिंग प्लाझा' हा उपक्रम पार पडणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या 'पीएमपी' बसच्या मार्गात बदल केला जाणार आहे. यामुळे ५० बसच्या मार्गात बदल होणार आहे. कोण कोणत्या मार्गात बदल केला जाणार, वाचा

मार्ग क्रमांक

५५, ५८ व ५९ शनिपार चौकहून अ. ब. चौक, नारायण पेठ, अलका टॉकीज चौकातून आपल्या निर्धारित मार्गाने.

मार्ग क्रमांक ५७ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून नारायण पेठमार्गे अलका टॉकीज चौक,आपल्या निर्धारित मार्गाने.

मार्ग क्रमांक.१७४ पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अ. ब. चौक, नारायणपेठ, अलका टॉकीज चौकहून आपल्या निर्धारित मार्गाने.

मार्ग क्रमांक

१९७ व २०२ या मार्गावरील बसेस हडपसर येथून कोथरूड डेपो, वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने धावेल. अ. ब. चौक, नारायण पेठमार्गे अलका टॉकीज चौक, आपल्या निर्धारित मार्गाने धावेल.

मार्ग क्रमांक ६८ या मार्गावरील बसेस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपोकडून सुतारदराकडे येताना टिळक रस्त्याने धावेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT