Pune Municipal Corporation releases list of 13 unauthorized schools, urging parents to verify recognition before admission. Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात १३ शाळा बोगस, महापालिकेने यादी केली जाहीर

List Of Illegal Schools In Pune 2025 PMC: पुणे महानगरपालिकेने १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून पालकांना प्रवेश घेताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातच बोगस शाळांचा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शहरातील १३ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेली अनधिकृत शाळांची यादी:

१. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडियम स्कूल - बिबवेवाडी, पुणे.

२. महात्मा गांधी प्रशाला - येरवडा, पुणे.

३. टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब - कोंढवा खुर्द, पुणे.

४. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल - कोंढवा बुद्रुक, पुणे.

५. इमॅन्युअल पब्लिक स्कूल - हडपसर, पुणे.

६. आकांक्षा अकॅडमी स्कूल - लोहगाव, पुणे.

७. एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल - नऱ्हे, पुणे.

८. लेगसी हाय स्कूल - कोंढवा बुद्रुक, पुणे.

९. शिबली नोमानी इंग्लिश मिडियम स्कूल - कोंढवा बुद्रुक, पुणे.

१०. ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल - उंड्री, ता. हवेली, पुणे.

११. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल - कौसरबाग, कोंढवा, पुणे.

१२. ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल - आंबेगाव बुद्रुक, पुणे.

१३. आर्यन वर्ल्ड स्कूल - उंड्री, पुणे.

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, पालकांनी आपल्या पाल्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची शासन मान्यता आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच निर्णय घ्यावा. माहिती व जनसंपर्क कार्यालया मार्फत हे आवाहन प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT