Pune Pimpri Chinchwad Crime News Saam TV News
मुंबई/पुणे

Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले

Pune Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवडच्या वालेकरवाडी भागात कोमल जाधव या १८ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या झाली. आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून तपास सुरु आहे.

Namdeo Kumbhar

Pune Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर मध्यरात्री तरूणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वालेकर वाडी येथे १८ वर्षांच्या तरूची धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रसंगाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेय. पोलिसांकडून तात्काळ या प्रकाराचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पिंपरी चिंचवड शहरातील वालेकर वाडी येथे एका अठरा वर्षे तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. वालेकरवाडी येथील कृष्णाई नगरमध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कोमल भरत जाधव या 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दुचाकी वाहनावर हेल्मेट घालून आलेल्या दोन आरोपींनी कोमल भरत जाधव हिच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे. तरुणीचा खून करण्यासाठी आलेले दोन्ही आरोपी दुचाकीवरून कृष्णाई नगर परिसरात फिरतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पोलिसांकडून अज्ञात मारेकाराचा शोध घेतल जात आहे.

रात्री साडेनऊ वाजताच्या भर चौकात १८ वर्षीय तरूणीची हत्या करण्यात आल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून तपास केला जातोय. पण हत्या का करण्यात आली? याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT