Navi Mumbai Police Commissioner Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: 'नवी मुंबईचा पोलिस आयुक्त बोलतोय...', पुण्याच्या तरुणाची फसवणूक, १० लाख उकळले

Pune Young Man Cheated Of Lakhs Rs : नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव आणि खोटे कागदपत्र दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे. तरुणाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त (Navi Mumbai Police Commissioner) यांचे नाव वापरून पुण्यातील तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने या तरुणाकडून १० लाख रुपये उकळण्यात आले. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव आणि खोटे कागदपत्र दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या २५ वर्षीय तरुणाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी ३ व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ३ जूनपासून ३ ऑगस्ट दरम्यान घडला आहे. फिर्यादीला मुंबईतील फेडेक्स कुरिअर कंपनीमधून मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी मिलिंद भारंबे बोलतोय असा एक फोन आला होता. फिर्यादीला खोटे सांगून त्याने इराणला कुठले पार्सल पाठवले आहे अशी विचारणा केली. यासंदर्भात आरोपींनी काही खोटी कागदपत्रे दाखवून आणि मुंबई पोलिसमध्ये काम करीत असल्याचे ओळखपत्र पाठवून फिर्यादीला धमकावले.

मुंबईमधून इरानला फेडेक्स पार्सल जे पाठवलं आहे ते सगळं 'क्लिअर' करायचे असेल आणि एनओसी मिळवायची असेल तर पैसे दे असे फिर्यादीला धमकावण्यात आले. फिर्यादीची सर्व बँक खात्याची माहिती घेऊन मनी लाँड्रींगबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून १० लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दरम्यान, याआधी देखील पुण्यातील अनेक तरुण-तरुणींची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये पोलिस असल्याचा बनाव करून पती-पत्नीला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. पुण्यातील कोंढवा परिसरातील ही घटना होती. परदेशी चलनासह ४ लाख ७९ हजार रुपये घेऊन आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करणयात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT