uday samant
uday samant  saam tv
मुंबई/पुणे

Uday Samant | वाहनावर हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Vishal Gangurde

पुणे : राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. आज पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. मात्र, या वाहनावर हल्ला करणारे कोण होते, हे अद्याप अस्पष्ट झालेले नाही. उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Uday Samant News )

पुण्यातील कात्रजमध्ये उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची काच फुटली आहे. उदय सामंत यांनी या हल्ल्याची तक्रार कोथरूड पोलीस स्थानकात केली आहे.वाहनावर हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांनी साम टिव्हीशी संवाद साधला. त्यावेळी उदय सामंत म्हणाले, ' माझा ताफा कोणी अडवला नव्हता. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलला गाडी थांबल्यानंतर काही तरुण बेसबॉलची स्टीक आणि हातात दगड घेऊन आले'

'हल्लेखोरांनी माझ्या वाहनावर हात मारायला सुरुवात केली. मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांनी वाहनाच्या मागच्या बाजूने वाहनाची काच फोडली. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सिग्नल सुरू झाल्यानंतर वाहन घेऊन मी तिथून पळालो. हल्लेखोरांचा हेतू वाईट होता. त्यांना कोणी पाठवलं असं वाटत नाही. त्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे. अशी प्रवृत्ती राजकारणात निर्माण होत असेल तर ठेचून काढली पाहिजे. या हल्ल्यानं मी घाबरणार नाही.राज्यात कशी गुंडाशाही आहे, हे राज्यात सांगणार आहे, असे ते म्हणाले.

पुढे म्हणाले, 'मला पोलिसांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी माझा जीव वाचवला. माझी गाडी सिग्नलला थांबली असताना हा भ्याड हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे उदय सामंत शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही. ही साथ अधिक मजबूत होणार आहे. माझ्या मतदार संघाच्या आर्शीवादाने, आई-वडिलांच्या पुण्याईनं या भ्याड हल्ल्यातून मी वाचलो आहे. मी याबाबत पोलिसांना सांगितले आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MI vs KKR, Toss Prediction: टॉस ठरेल बॉस! KKR ला हरवण्यासाठी मुंबईने आधी काय करावं?

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल, सभास्थळी ६.३० वाजता येणार

Share Market Today : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला, झटक्यात गुंतवणूकदारांचे ३ कोटी बुडाले

SCROLL FOR NEXT