Shirur News Marathi Saam TV
मुंबई/पुणे

Shirur News : दुर्देवी घटना! मामाच्या गावी आलेल्या भावंडांवर काळाची झडप; शेततळ्यात बुडून सख्या भावांचा मृत्यू

Shirur News Marathi : उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या दोन सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथे घडली.

रोहिदास गाडगे

उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या दोन सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथे घडली. आर्यन संतोष नवले (वय १३) आणि आयुष संतोष नवले (वय १०) अशी मृत भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाबळ येथे राहणारे सचिन जाधव यांचे भाचे उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी आले होते. बुधवारी (ता. २२) दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन्ही भाऊ आजोबांसोबत शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले.

उन्हाचा तडाखा प्रचंड असल्याने दोन्ही भावंडांनी आजोबाची नजर चुकवली. जवळच असलेल्या शेततळ्यामध्ये ते पोहण्यासाठी गेले. दोघांनी कपडे काढून पाण्यामध्ये उड्या मारल्या. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

मुले कुठेही दिसून न आल्यामुळे आजोबाने त्यांचा शोध घेतला. शेततळ्यावर जाऊन पाहिले असता, दोन्ही मुले पाण्यात बुडालेली दिसून आली. आरडाओरड झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोघांनाही पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. याबाबत मुलांचे मामा सचिन बाळासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : चालता चालता जमिनीवर कोसळले, पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |CCTV

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Pooja Sawant: असं सौंदर्य पाहिलं अन् मनात काहूर माजलं

Nashik : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी उतरवला केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा माज, काय आहे प्रकरण?

World Cup 2027: रोहित-कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? काय म्हणाला कर्णधार गिल?

SCROLL FOR NEXT