Pune Solapur Highway Accident:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident News: भीषण अपघात! कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले; १८ वर्षीय तरुणाचा करुण अंत

Pune Solapur Highway Accident: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्यात झालेल्या अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड| पुणे, ता. १५ सप्टेंबर २०२४

Pune Solapur Accident News: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन एक मोठ्या अपघाताची घटना समोर आली आहे. कदम वाकवस्ती (ता. हवेली) येथे कंटेनर व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक जण जखमी झाला आहे. सार्थक विकास बाहेती असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्यात झालेल्या अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंगूर वाइ च्या समोर सात वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे. सार्थक विकास बाहेती (वय 18, रा. कवडीपाट टोल नाक्याजवळ, कदमवाकवस्ती तालुका हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सार्थक बाहेती व त्याचा मित्र दुचाकीवरून त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त लोणी स्टेशनकडे दुचाकीवरून चालले होते. सार्थक हा गाडी चालवत होता तर त्याचा मित्र पाठीमागे बसला होता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी, कदम वाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एचपी गेटसमोर असलेल्या अंगूरवाईंच्या कॉर्नरजवळ आली असता त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली.

या अपघातात सार्थक हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या अंगावरून कंटेनर गेला. या अपघातात सार्थक हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र या अपघातात किरकोळ जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT