Sharad Pawar on Ajit Pawar and NCP SAAM TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar Vs Ajit Pawar: बंडावरुन वार- पलटवार! अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर; म्हणाले...

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे|ता. २५ डिसेंबर २०२३

Pune News:

बारामतीकरांनी फक्त माझं ऐकावं, असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले तर मी ६० व्या वर्षी भूमिका घेतली असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला होता. आता अजित पवार यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनीही उत्तर दिले आहे. पुण्यामध्ये भीमथडी यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Maharashtra Politics News)

काय म्हणाले शरद पवार?

"मागील दहा- पंधरा वर्ष बारामती (Baramati) आणि परिसरातील स्थानिक कामे, निवडणूका यामध्ये माझे लक्ष नव्हते. याचा अर्थ मी कोणाला तरी काम करण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक दिली होती. देशात आणि राज्यात नेहमी नवीन लोकांना संधी देण्याचा मी प्रयत्न केला.." असे शरद पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांना टोला...

यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी वसंतदादांचे सरकार असताना केलेल्या बंडाचाही उल्लेख केला. "आम्ही कोणत्याही प्रकारचे बंड केले नव्हते. सर्वांनी बसून निर्णय घेतला होता. असे शरद पवार म्हणाले. तसेच आता जरी कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर त्याबाबत तक्रारीचं कारण नाही, असे म्हणत पक्षाची निर्मीती कशी झाली? संस्थापक कोण आहे?हे जगजाहीर आहे, त्यामुळे यावर जास्त बोलण्याची गरज नाही..." असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदींविरोधात चेहरा कोण?

यावेळी बोलताना शरद पवार यांनी 'इंडिया' आघाडीचा (India Aaghadi) पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? याबाबतही महत्वाचे विधान केले. १९७७ च्या निवडणूकांचा दाखला देत "१९७७ मध्ये कोणा एकाला प्रोजेक्ट केले नव्हते. निवडणुक झाल्यावर मोरारजी, देसाई यांची निवड झाली. त्यामुळे लोकांना माहीती आहे. काय करायचे. त्याची काळजी करायची गरज नसल्याचे ते म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT