INS Imphal : चीन, पाकिस्तानचा थरकाप उडणार; आयएनस इंफाळ नौदलात सामील होणार, वैशिष्ट्य वाचा

INS Imphal News : INS इंफाळ उद्या 26 डिसेंबर रोजी मुंबईतील माझगाव डॉकमधून भारतीय नौदलात दाखल होणार आहे. यादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत.
INS IMPHAL
INS IMPHALSaam TV
Published On

INS Imphal :

भारतीय नौदलाने आपली ताकद वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय नौदल ब्रह्मोस आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आयएनएस इंफाळ लवकरच नौदलात सामील होणार आहे. INS इम्फाळ या नावाला राष्ट्रपतींनी 16 एप्रिल 2019 रोजी मान्यता दिली होती.

INS इंफाळ उद्या 26 डिसेंबर रोजी मुंबईतील माझगाव डॉकमधून भारतीय नौदलात दाखल होणार आहे. यादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत. सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्यानंतर 20 ऑक्टोबर 2023 रोजी ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.

INS IMPHAL
Poonch Terrorist Attack: मार्चमध्ये होणार होते लग्न; तर कुणी पत्नीला दिलं होतं वचन, दहशतवाद्यांच्या हल्लानंतर सगळं संपलं

INS इम्फाळचं डिझाईन भारतीय नौदलाचीअंतर्गत संस्था वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे. युद्धनौकेचे बांधकाम 19 मे 2017 रोजी सुरू झाले होते. अत्यंत कमी वेळेत या युद्धनौकेची निर्मिती आणि चाचणी करण्यात आली आहे.

यापूर्वी, भारतीय नौदलाने 21 नोव्हेंबर 2021 रोजी प्रोजेक्टर 15B अंतर्गत तयार केलेल्या INS विशाखापट्टणम आणि 18 डिसेंबर 2022 रोजी INS मरमुगावला कमिशनिंग करून आपली ताकद वाढवली होती. आता INS इंफाळच्या माध्यमातून भारतीय नौदल आपली ताकद आणखी वाढवत आहे.

INS IMPHAL
Maharashtra Water Issue: राज्यात नववर्षात पाणीबाणी; धरणांतील पाणीपातळी चिंताजनक, पाहा आकडेवारी

INS इंफाळची वैशिष्ट्ये

  • INS इंफाळची उंची 57 फूट आहे. तर 535 फूट लांबी आहे. वजन 7400 टन आहे.

  • युद्धनौकेचा वेग 56 किलोमीटर प्रति तास आहे.

  • आधुनिक शस्त्रे, ब्रह्मोस क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा.

  • अँटिशिप सेन्सर्ड मिसाईल, सर्व्हिलन्स रडार.

  • 42 दिवस समुद्रात राहू शकते. 300 सैनिक तैनात केले जाऊ शकतात.

  • 8 क्षेपणास्त्रे, 16 ब्रह्मोस जहाजविरोधी क्षेपणास्त्रे.

  • 2 ध्रुव आणि सी-किंग हेलिकॉप्टर, 2 अँटी सबमरीन वाहून नेण्याची क्षमता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com