pune accident News
pune accident News saam tv
मुंबई/पुणे

Pune News : अरे चाललंय काय? पुण्यातील भूमकर पुलाजवळ २ तासांत दुसरा अपघात

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune Accident News : पुण्यातील भूमकर पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. पुण्यातील भूमकर पुलाजवळ पुन्हा दुसरा अपघात झाला आहे. २ तासात हा दुसरा अपघात आहे. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) भूमकर पुलाजवळ पुन्हा दुसरा अपघात झाला आहे. अवघ्या दोन तासांत दुसरा अपघात झाला आहे. भूमकर पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिराच्या समोर हा अपघात झाला आहे. कंटेरनचा ब्रेक निकामी झाल्यामुळे या कंटेनरने समोरील वाहनांना धडक दिली. या कंटेनरने पुढे असलेल्या ३ वाहनांना धडक दिली. यात २ चारचाकी वाहने आणि एक ट्रॅव्हलर बस होती.

एका चारचाकी वाहनामध्ये कुटुंब प्रवास करत होते. सुदैवाने यातील लहान मुलांसह कारमधील इतर व्यक्तींना काही झालेले नाही. मात्र, कंटेनरची धडक बसल्याने कारचे टायर फुटले आहे. कंटेनरचा ड्रायव्हर घटनास्थळी असून पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

कंटेनरची लेन तोडून चारचाकी गाडीला धडक

कंटेनरने चारचाकीला गाडीला धडक दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. कंटेनर डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसला. याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता. अपघाताबद्दल कारचालकाने सांगितलं की, कोल्हापूरहून येत असताना पुलावर दुरुस्तीचं काम सुरु होतं. त्यामुळे सर्व गाड्यांची वाहतूक एका बाजूने सुरु होती. त्यावेळी ट्रकने मागून येऊन धडक दिली. ट्रक अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला आहे.

ब्रेक फेल झाल्याने ट्रक अनियंत्रित झाला होता. ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होतो मात्र ट्रक थांबवण्यात अपयश आल्याने पुढील कारला धडक बसली, अशी माहिती ट्रक चालकाने दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT