Pune : नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबविण्यासाठी सुप्रिया सुळेंनी टाकलं पाऊल; थेट जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाऊल टाकलं आहे.
pune
pune saam tv
Published On

प्राची कुलकर्णी

Supriya Sule News : मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाऊल टाकलं आहे.

पुण्यातील नवले पुलावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

pune
Navale Bridge Accident: नवले पुलावरील भीषण अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला चाकणमधून अटक

खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले आहे. प्रशासनाने बैठकी घेऊन रस्ता सुरक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच रस्त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पत्रात म्हटले आहे की, 'मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असून या संदर्भात उपाय योजना करण्यासंदर्भात मी वेळोवेळी बैठकी द्वारे तसेच पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवले पुल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. सदर ठिकाणी मी वेळोवेळी भेट देऊन पाहणी देखील केली आहे व त्यानुसार बैठकीत सर्व्हिस रस्त्याची कामे करणे, महामार्गावरील पंक्चर बंद करणे, अतिक्रमण काढणे अशा आपत्कालीन उपाययोजनाही सुचविल्या आहेत'.

'नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावण्यात यावेत, स्टड लाईट बसवावेत तसेच विविध ठिकाणी रम्बल स्ट्रीप, सोलर बिल्कर देखील लावण्यात यावेत, कर्ब पेंटिंग करावे, वाहन चालकांना डोन्ट ड्रिंक अंड ड्राईव्ह, गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा, अशा सूचना देणारे फलक लावण्यात यावेत, असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

'या सारख्या अपघातांवर नियंत्रण करण्यासाठीच्या उपाय योजना तातडीने पूर्ण होणे बाबत कार्यवाही होणे बाबत मागणी केली होती. स्वामीनारायण मंदिर ते वडगाव पूल असा पूल बांधणे आवश्यक आहे, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे, असेही सुप्रिया सुळे पत्रात लिहिलं आहे.

pune
Navale Bridge News: अपघातानंतर प्रशासनाला आली जाग; नवले पुल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा

'या मार्गावर सातत्याने होणान्या अपघातांच्य पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आराखडा सादर केला आहे. अशातच नवले पूल परिसरात २० नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेचा व अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर माझी आपणास विनंती आहे की रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत असलेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

तसेच सदर बैठकीचे नियमित आयोजन करून रस्ते सुरेक्षेच्या समस्या मार्गी लावणे बाबत आढावा घेऊन सूचनांनुसार योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com