Navale Bridge Accident: नवले पुलावरील भीषण अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला चाकणमधून अटक

Navale Bridge Accident Driver: आरोपी मनीलाल यादव यांच्यावर अपघाताप्रकरणी पुण्यातील सिंहगड पोलीस स्थानकात विविध कलमाने आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navale Bridge Accident Driver
Navale Bridge Accident Driverगोपाल मोटघरे

Pune Latest News: पुण्यातील नवले पुलावरील भीषण अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला चाकणमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी ड्रायव्हर मनीराम छोटेलाल यादव याला सिंहगड पोलिसांनी पुण्यातील चाकण मधून अटक केली आहे.

Navale Bridge Accident Driver
Burning Car Video: ठाण्यात बर्निंग कारचा थरार; चालत्या कारला लागलेल्या आगीत दोन रिक्षाही जळून खाक

रविवारी २० नोव्हेंबरला रात्री पुण्यातील नरे आंबेगाव रोडवर ट्रक चालकाच्या चुकीमुळे तब्बल ४८ गाड्यांचा भीषण अपघात झाला होता. अपघातात (Accident) आणि चालक आणि प्रवासी जखमी झाल्यानंतर आरोपी यादव हा ट्रक जाग्यावर सोडून गेला होता. आरोपी चाकणमध्ये (Pune) एका ट्रकच्या खाली लपून बसण्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपी मनीलाल यादव यांच्यावर अपघाताप्रकरणी पुण्यातील सिंहगड पोलीस स्थानकात विविध कलमाने आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 487/2022 नुसार आणि भारतीय दंड विधान सहिंतेच्या कलम 279,337,338,427 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या अपघातात वाहन क्रमांक AP 02 TE 5858 चा चालक मनीराम छोटेलाल यादव, वय 24 रा.ग्राम उमरिया, तहसील गुड, जिल्हा रिबा मध्यप्रदेश याला अटक करण्यात आली आहे. त

सेच ट्रकवरील क्लीनर ललित यादव, वय 24, रा. ग्राम महूगंज जिल्हा रिबा मध्यप्रदेश यालाही सिंहगड रोड पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या दोन्ही आरोपींना चाकणमधील नानेकर वाडी येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Navale Bridge Accident Driver
संतापजनक! पुण्यात सावत्र बापाकडून ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; नराधमाविरोधात गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं होतं?

रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्यात मोठी दुर्घटना घडली होती. नवले पूलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की यात सुमारे ४८ वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या अपघाताची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. 

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com