Navale Bridge News: अपघातानंतर प्रशासनाला आली जाग; नवले पुल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा

Navale Bridge Encroachment News: पुणे महापालिका अतिक्रमण विभाग आणि 100 हून अधिक पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.
Navale Bridge Encroachment
Navale Bridge Encroachment
Published On

Navale Bridge Encroachment News : नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अखेर या परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारला. मंगळवारी सकाळीच 100 पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली.

Navale Bridge Encroachment
Navale Bridge Accident: नवले पुलावरील भीषण अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला चाकणमधून अटक

कात्रज नवीन बोगदा ते नवले पुल या परिसरात रविवारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात  (Accident) 10 जण गंभीर जखमी झाले, तर एका तरुणाचा मृत्यू झाला. याबरोबरच सुमारे 32 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार, पोलिस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकाने सोमवारी घटना स्थळाची पाहणी करून तत्काळ करण्याच्या उपाययोजना सुचविल्या होत्या. तसेच सातत्याने होणाऱ्या अपघाताबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले होते.

Navale Bridge Encroachment
संतापजनक! पुण्यात सावत्र बापाकडून ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; नराधमाविरोधात गुन्हा दाखल

या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नवले पुल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. महापालिकेचे शेकडो कर्मचारी यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिका अतिक्रमण विभाग पोलिस बंदोबस्त तसेच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सुमारे 100 हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com