Pune railway announced mega block on sunday  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Railway Block: महत्वाची बातमी! पुण्यात २ दिवस रेल्वेचा मेगाब्लॉक; लोकलसह अनेक गाड्या रद्द, वाचा सविस्तर...

Pune Mega Block News Update: पुण्यामध्ये (Pune) शनिवारी आणि रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक राहणार आहे. या काळात अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Railway Mega Block:

पुणे शहर परिसरातील रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी. पुण्यामध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी (२६, २७ नोव्हेंबर) रेल्वेमहामार्गावर विशेष मेगा ब्लॉक राहणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे पुणे रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहे तर काही गाड्यांची वेळ बदलली आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. जाणून घ्या सविस्तर.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये (Pune) शनिवारी आणि रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक राहणार आहे. खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत.

मेगाब्लॉक काळात पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्या आहेत. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून, काहींच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. तसेच पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ४६ सेवा रद्द केल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, रविवारी सकाळी मुंबईहून येणारी इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, कोयना एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT