Konkan Railway Mega Block: कोकण रेल्वेचा ३ तासांचा मेगा ब्लॉक; 'या' ट्रेनच्या वेळापत्रकात बदल

Mega Block: रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हर हेड वायर दुरुस्तीच्या कामांसाठी कोकण रेल्वेनं उद्या तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय.
Konkan Railway Mega Block
Konkan Railway Mega BlockSaam TV
Published On

भरत जाधव

Konkan Railway Mega Block:

रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हर हेड वायर दुरुस्तीच्या कामांसाठी कोकण रेल्वेनं उद्या तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे कोकणाकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. (Latest Marathi News)

रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती आदी स्वरुपाच्या कामांसाठी कोकण रेल्वेनं मंगळवारी १२.२० ते ३.२० या वेळेत मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलाय. या मेगाब्लॉकमळे दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत करंजवाडी ते चिपळूण या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावतील.

Konkan Railway Mega Block
Maharashtra Politics: वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; महायुतीच्या बैठकीत ३ महत्वाचे ठराव पारित

तर आज कोईम्बतूर जंक्शन येथून निघालेली जबलपूर एक्स्प्रेस मडगाव जंक्शनदरम्यान ९० मिनिटांसाठी थांबवली जाईल. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड ते दिवा जंक्शन दरम्यान १०१०६ एक्स्प्रेसचा ५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरू होईल. या एक्स्प्रेसचा (Express train) प्रवास सावंतवाडी रोड ते चिपळूण दरम्यान ९० मिनिटांसाठी नियंत्रित केला जाईल.

याचदिवशी लोकमान्य टिळक टर्मिनलवरून मध्य नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होईल, परंतु कोलाड-वीर विभागादरम्यान हा प्रवास ३० मिनिटांसाठी थांबवला जाईल. तसेच मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन (१०१०८) मेमू ही एक्स्प्रेस ७ सप्टेंबर रोजी धावेल. परंतु नेहमीच्या वेळानुसार या एक्स्प्रेसाचा प्रवास ७५ मिनिटे उशिराने सुरू होईल. तर मंगळरू जंक्शन येथून मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास ६० मिनिटे उशिराने सुरू होईल.

Konkan Railway Mega Block
Mumbai Local Train News: कल्याण रेल्वेस्थानकावर तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चाकरमान्यांची तारांबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com